गणना 25 : 1 (ERVMR)
इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.
गणना 25 : 2 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
गणना 25 : 3 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
गणना 25 : 4 (ERVMR)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल. त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”
गणना 25 : 5 (ERVMR)
मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने अशा कुटुंब प्रमुखाला शोधले पाहिजे की ज्याने लोकांना बआलपौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला भाग पाडले. नंतर तुम्ही त्या माणसांना मारून टाका.”
गणना 25 : 6 (ERVMR)
त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी (पुढारी) दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले होते. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भाऊंच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडील धारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते खूप दु:खी झाले.
गणना 25 : 7 (ERVMR)
फिनहास हा एलाजारचा मुलगा आणि याजक अहरोन याचा नातू होता. फिनहासने या माणसाला त्या स्त्रीला आणताना पाहिले. म्हणून फिनहासने तंबू सोडला व त्याने त्याची बरची घेतली
गणना 25 : 8 (ERVMR)
त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपात मारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला.
गणना 25 : 9 (ERVMR)
या आजारामुळे एकून 24000 लोक मेले.
गणना 25 : 11 (ERVMR)
“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.
गणना 25 : 12 (ERVMR)
फिनिहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतिचा करार करीत आहे.
गणना 25 : 13 (ERVMR)
तो करार हा आहे: तो आणि त्याच्या नंतरचे त्याचे वंशज याजक होतील. कारण आपल्या देवाबद्दलच्या त्याच्या भावना खूप तीव्र होत्या. आणि त्याने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे इस्राएलचे लोक शुद्ध झाले.
गणना 25 : 14 (ERVMR)
मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली माणूस मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
गणना 25 : 15 (ERVMR)
आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
गणना 25 : 17 (ERVMR)
“तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानचे लोक तुझे शत्रू आहेत.
गणना 25 : 18 (ERVMR)
तू त्यांना ठार मारले पाहिजेस. त्यांनी अगोदरच तुम्हाला त्यांचे शत्रू केले आहे त्यांनी तुला पिओर येथे फसवले आहे. आणि त्यांनी तुला कजबीच्या बाबतीतही नीचपणाने फसवले. ती मिद्यानच्या पुढाऱ्याची मुलगी होती. पण इस्राएल लोकांमध्ये आजार पसरला तेव्हा ती मारली गेली. बआल पौर या खोट्या देवतेची लोकांना फसवून उपासना करायला लावली म्हणून तो आजार इस्राएल लोकांमध्ये पसरला होता.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18