नीतिसूत्रे 2 : 1 (ERVMR)
मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव.
नीतिसूत्रे 2 : 2 (ERVMR)
ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.
नीतिसूत्रे 2 : 3 (ERVMR)
ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव.
नीतिसूत्रे 2 : 4 (ERVMR)
ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे.
नीतिसूत्रे 2 : 5 (ERVMR)
जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.
नीतिसूत्रे 2 : 6 (ERVMR)
परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.
नीतिसूत्रे 2 : 7 (ERVMR)
तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे.
नीतिसूत्रे 2 : 8 (ERVMR)
जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
नीतिसूत्रे 2 : 9 (ERVMR)
म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील.
नीतिसूत्रे 2 : 10 (ERVMR)
ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.
नीतिसूत्रे 2 : 11 (ERVMR)
ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल.
नीतिसूत्रे 2 : 12 (ERVMR)
ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात.
नीतिसूत्रे 2 : 13 (ERVMR)
त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत.
नीतिसूत्रे 2 : 14 (ERVMR)
त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात.
नीतिसूत्रे 2 : 15 (ERVMR)
त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.
नीतिसूत्रे 2 : 16 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 2 : 17 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 2 : 18 (ERVMR)
तिच्या बरोबर घरात जाणे म्हणजे विनाशाकडे नेणारे पहिले पाऊल उचलणे. जर तू तिच्या मागे गेलास तर ती तुला तुझ्या कबरेकडे घेऊन जाईल.
नीतिसूत्रे 2 : 19 (ERVMR)
ती उघड्या कबरेसारखी आहे. जे लोक तिच्याकडे आत जातात ते जीवनाला मुकतात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.
नीतिसूत्रे 2 : 20 (ERVMR)
ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील.
नीतिसूत्रे 2 : 21 (ERVMR)
चांगले प्रमाणिक लोक स्वत:च्या जमीनीवर राहातील. साधे प्रमाणिक लोक स्वत:ची जमीन राखतील.
नीतिसूत्रे 2 : 22 (ERVMR)
परंतु दुष्ट लोक त्यांच्या जमीनीला मुकतील. जे लोक खोटे बोलतात व फसवतात त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर नेले जाईल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22