नीतिसूत्रे 23 : 1 (ERVMR)
जेव्हा तुम्ही महत्वाच्या लोकांबरोबर बसता आणि खाता तेव्हा तुम्ही कुणाबरोबर आहात याचे भान ठेवा.
नीतिसूत्रे 23 : 2 (ERVMR)
जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका.
नीतिसूत्रे 23 : 3 (ERVMR)
आणि तो जे चांगले पदार्थ वाढतो तेही जास्त खाऊ नका. तो कदाचित् एखादा डाव असू शकेल.
नीतिसूत्रे 23 : 4 (ERVMR)
श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करु नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धराल.
नीतिसूत्रे 23 : 5 (ERVMR)
पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो.
नीतिसूत्रे 23 : 6 (ERVMR)
स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा.
नीतिसूत्रे 23 : 7 (ERVMR)
जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही.
नीतिसूत्रे 23 : 8 (ERVMR)
आणि तुम्ही जर त्याचे अन्न खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल आणि तुम्हाला शरम वाटेल.
नीतिसूत्रे 23 : 9 (ERVMR)
मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करु नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील.
नीतिसूत्रे 23 : 10 (ERVMR)
जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका.
नीतिसूत्रे 23 : 11 (ERVMR)
परमेश्वर तुमच्या विरुध्द जाईल. परमेश्वर शक्तिशाली आहे आणि तो त्या निराधार मुलाचे रक्षण करील.
नीतिसूत्रे 23 : 12 (ERVMR)
तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका.
नीतिसूत्रे 23 : 13 (ERVMR)
गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही.
नीतिसूत्रे 23 : 14 (ERVMR)
चापटी मारुन तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल.
नीतिसूत्रे 23 : 15 (ERVMR)
मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन.
नीतिसूत्रे 23 : 16 (ERVMR)
तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल.
नीतिसूत्रे 23 : 17 (ERVMR)
दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची परकाष्ठा करा.
नीतिसूत्रे 23 : 18 (ERVMR)
आशेला नेहमीच जागा असते. आणि ती आशा अमर आहे.
नीतिसूत्रे 23 : 19 (ERVMR)
म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो. योग्य रीतीने जगण्याची काळजी घे.
नीतिसूत्रे 23 : 20 (ERVMR)
खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करु नकोस.
नीतिसूत्रे 23 : 21 (ERVMR)
जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही.
नीतिसूत्रे 23 : 22 (ERVMR)
तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर.
नीतिसूत्रे 23 : 23 (ERVMR)
सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता न येण्याइतके अधिक आहे.
नीतिसूत्रे 23 : 24 (ERVMR)
चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते.
नीतिसूत्रे 23 : 25 (ERVMR)
म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या.
नीतिसूत्रे 23 : 26 (ERVMR)
मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे.
नीतिसूत्रे 23 : 27 (ERVMR)
वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही.
नीतिसूत्रे 23 : 28 (ERVMR)
वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते. आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते.
नीतिसूत्रे 23 : 29 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 23 : 30 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 23 : 31 (ERVMR)
म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो.
नीतिसूत्रे 23 : 32 (ERVMR)
पण शेवटी तो सापासारखा चावतो.
नीतिसूत्रे 23 : 33 (ERVMR)
द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते.
नीतिसूत्रे 23 : 34 (ERVMR)
तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल.
नीतिसूत्रे 23 : 35 (ERVMR)
तुम्ही म्हणाल, “त्यांना मला मारले पण मला ते कळलेसुध्दा नाही. त्यांनी मला खूप मारले पण मला ते आठवत नाही. आता मी जागा होऊ शकत नाही. मला आणखी प्यायला द्या.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35