नीतिसूत्रे 5 : 1 (ERVMR)
मुला, माझ्या शहाणपणाच्या शिकवणुकीकडे लक्ष दे. माझ्या समजूत निर्माण करणाऱ्या शब्दाकडे लक्ष दे.
नीतिसूत्रे 5 : 2 (ERVMR)
नंतर तुला जगण्याचा योग्य मार्ग कळेल. तुझे शब्द तू शहाणा आहेस हे दाखवून देतील.
नीतिसूत्रे 5 : 3 (ERVMR)
दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील.
नीतिसूत्रे 5 : 4 (ERVMR)
पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.
नीतिसूत्रे 5 : 5 (ERVMR)
तिचे पाय मृत्यूलाच जाऊन भिडतात. ती तुला सरळ कबरेत नेईल.
नीतिसूत्रे 5 : 6 (ERVMR)
तिच्या मागे जाऊ नकोस. तिने योग्य मार्ग सोडला आहे आणि ते तिला माहीत नाही. काळजीपूर्वक राहा. जीवनाचा योग्य मार्ग आचर.
नीतिसूत्रे 5 : 7 (ERVMR)
मुलांनो, आता माझे ऐका. मी जे सांगतो ते विसरु नका.
नीतिसूत्रे 5 : 8 (ERVMR)
जी स्त्री व्यभिचार करते तिच्यापासून दूर राहा. तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नका.
नीतिसूत्रे 5 : 9 (ERVMR)
जर तुम्ही गेलात तर तुम्ही लोकांच्या मनातल्या तुमच्या विषयीच्या आदराला मुकाल. तुमचा गेलेला मान दुसरे लोक घेतील. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाला मुकाल. दुष्ट लोक ते तुमच्यापासून हिरावून घेतील.
नीतिसूत्रे 5 : 10 (ERVMR)
तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
नीतिसूत्रे 5 : 11 (ERVMR)
तुम्ही आयुष्याच्या शेवटी कष्टी व्हाल. तुमचे शरीर आणि मन सर्व काही नाश पावेल.
नीतिसूत्रे 5 : 12 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 5 : 13 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 5 : 14 (ERVMR)
आता शेवटी मला दिसते की माझे आयुष्य वाया गेले आहे. आणि सगळ्या लोकांना माझी लाज दिसते आहे.”
नीतिसूत्रे 5 : 15 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 5 : 16 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 5 : 17 (ERVMR)
तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
नीतिसूत्रे 5 : 18 (ERVMR)
म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग.
नीतिसूत्रे 5 : 19 (ERVMR)
ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो.
नीतिसूत्रे 5 : 20 (ERVMR)
दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.
नीतिसूत्रे 5 : 21 (ERVMR)
तू जे काही करतोस ते परमेश्वराला स्पष्ट दिसते तू कुठे जातोस ते परमेश्वर बघतो.
नीतिसूत्रे 5 : 22 (ERVMR)
दुष्ट माणसाची पापे त्याला जाळ्यात पकडतील त्याची पापे दोरीप्रमाणे त्याला पकडतील.
नीतिसूत्रे 5 : 23 (ERVMR)
तो दुष्ट माणूस मरेल कारण त्याने शिस्त नाकारली. तो स्वत: च्या मूर्खपणामुळेच अडकला जाईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23