नीतिसूत्रे 6 : 1 (ERVMR)
मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का?
नीतिसूत्रे 6 : 2 (ERVMR)
तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले.
नीतिसूत्रे 6 : 3 (ERVMR)
तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
नीतिसूत्रे 6 : 4 (ERVMR)
विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस.
नीतिसूत्रे 6 : 5 (ERVMR)
शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव.
नीतिसूत्रे 6 : 6 (ERVMR)
आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक.
नीतिसूत्रे 6 : 7 (ERVMR)
मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही.
नीतिसूत्रे 6 : 8 (ERVMR)
पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.
नीतिसूत्रे 6 : 9 (ERVMR)
आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस?
नीतिसूत्रे 6 : 10 (ERVMR)
आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी हथे थोड्या वेळासाठी पडतो.”
नीतिसूत्रे 6 : 11 (ERVMR)
परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल.
नीतिसूत्रे 6 : 12 (ERVMR)
दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो.
नीतिसूत्रे 6 : 13 (ERVMR)
तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो.
नीतिसूत्रे 6 : 14 (ERVMR)
तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो.
नीतिसूत्रे 6 : 15 (ERVMR)
पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही.
नीतिसूत्रे 6 : 16 (ERVMR)
परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.
नीतिसूत्रे 6 : 17 (ERVMR)
डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
नीतिसूत्रे 6 : 18 (ERVMR)
ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
नीतिसूत्रे 6 : 19 (ERVMR)
माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
नीतिसूत्रे 6 : 20 (ERVMR)
माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
नीतिसूत्रे 6 : 21 (ERVMR)
त्याचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव.
नीतिसूत्रे 6 : 22 (ERVMR)
त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
नीतिसूत्रे 6 : 23 (ERVMR)
तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात.
नीतिसूत्रे 6 : 24 (ERVMR)
त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
नीतिसूत्रे 6 : 25 (ERVMR)
ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस.
नीतिसूत्रे 6 : 26 (ERVMR)
वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
नीतिसूत्रे 6 : 27 (ERVMR)
जर एखाद्याने स्वत:वर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील.
नीतिसूत्रे 6 : 28 (ERVMR)
जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील.
नीतिसूत्रे 6 : 29 (ERVMR)
दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
नीतिसूत्रे 6 : 30 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 6 : 31 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
नीतिसूत्रे 6 : 32 (ERVMR)
पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
नीतिसूत्रे 6 : 33 (ERVMR)
लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही.
नीतिसूत्रे 6 : 34 (ERVMR)
त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल.
नीतिसूत्रे 6 : 35 (ERVMR)
त्याचा राग शांत करण्यासाठी कितीही पैसा दिला तरी तो पुरेसा ठरणार नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35