स्तोत्रसंहिता 102 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
स्तोत्रसंहिता 102 : 2 (ERVMR)
परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
स्तोत्रसंहिता 102 : 3 (ERVMR)
माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 4 (ERVMR)
माझी शक्ती निघून गेली आहे. मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे. मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
स्तोत्रसंहिता 102 : 5 (ERVMR)
माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 6 (ERVMR)
मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे. जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 7 (ERVMR)
मी झोपू शकत नाही. मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 8 (ERVMR)
माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
स्तोत्रसंहिता 102 : 9 (ERVMR)
माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे. माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
स्तोत्रसंहिता 102 : 10 (ERVMR)
का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
स्तोत्रसंहिता 102 : 11 (ERVMR)
दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे. मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 12 (ERVMR)
पण परमेश्वरा, तू सदैव असशील तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
स्तोत्रसंहिता 102 : 13 (ERVMR)
तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
स्तोत्रसंहिता 102 : 14 (ERVMR)
तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात. त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
स्तोत्रसंहिता 102 : 15 (ERVMR)
लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
स्तोत्रसंहिता 102 : 16 (ERVMR)
परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील.
स्तोत्रसंहिता 102 : 17 (ERVMR)
देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
स्तोत्रसंहिता 102 : 18 (ERVMR)
पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 19 (ERVMR)
परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील. परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
स्तोत्रसंहिता 102 : 20 (ERVMR)
आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
स्तोत्रसंहिता 102 : 21 (ERVMR)
नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील. ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 22 (ERVMR)
सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये परमेश्वराची एकत्र सेवा करतील.
स्तोत्रसंहिता 102 : 23 (ERVMR)
मला माझ्या शक्तीने दगा दिला. माझे आयुष्य कमी झाले.
स्तोत्रसंहिता 102 : 24 (ERVMR)
म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
स्तोत्रसंहिता 102 : 25 (ERVMR)
तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
स्तोत्रसंहिता 102 : 26 (ERVMR)
जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
स्तोत्रसंहिता 102 : 27 (ERVMR)
पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील.
स्तोत्रसंहिता 102 : 28 (ERVMR)
आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28