स्तोत्रसंहिता 104 : 1 (ERVMR)
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
स्तोत्रसंहिता 104 : 2 (ERVMR)
माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
स्तोत्रसंहिता 104 : 3 (ERVMR)
देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
स्तोत्रसंहिता 104 : 4 (ERVMR)
देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकांना78 अग्रीसारखे.
स्तोत्रसंहिता 104 : 5 (ERVMR)
देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेनेउ भारलेस की तिचा कधीही नाश होणार नाही.
स्तोत्रसंहिता 104 : 6 (ERVMR)
तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस, पाण्याने डोंगरही झाकले गेले.
स्तोत्रसंहिता 104 : 7 (ERVMR)
परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले. देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
स्तोत्रसंहिता 104 : 8 (ERVMR)
पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
स्तोत्रसंहिता 104 : 9 (ERVMR)
तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
स्तोत्रसंहिता 104 : 10 (ERVMR)
देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
स्तोत्रसंहिता 104 : 11 (ERVMR)
झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.
स्तोत्रसंहिता 104 : 12 (ERVMR)
पानपक्षी तेथे वस्ती करतात. ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात.
स्तोत्रसंहिता 104 : 13 (ERVMR)
देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.
स्तोत्रसंहिता 104 : 14 (ERVMR)
देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
स्तोत्रसंहिता 104 : 15 (ERVMR)
देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.
स्तोत्रसंहिता 104 : 16 (ERVMR)
लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.
स्तोत्रसंहिता 104 : 17 (ERVMR)
पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात. मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहातात.
स्तोत्रसंहिता 104 : 18 (ERVMR)
रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात. मोठ मोठे खडक कोल्ह प्राण्याची लपून बसायची जागा आहे.
स्तोत्रसंहिता 104 : 19 (ERVMR)
देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
स्तोत्रसंहिता 104 : 20 (ERVMR)
तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात आणि इकडे तिकडे फिरतात.
स्तोत्रसंहिता 104 : 21 (ERVMR)
सिंह हल्ला करताना गर्जना करतात. जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.
स्तोत्रसंहिता 104 : 22 (ERVMR)
नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात.
स्तोत्रसंहिता 104 : 23 (ERVMR)
नंतर लोक त्यांचे काम करायला जातात आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात.
स्तोत्रसंहिता 104 : 24 (ERVMR)
परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
स्तोत्रसंहिता 104 : 25 (ERVMR)
समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके.
स्तोत्रसंहिता 104 : 26 (ERVMR)
समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान, तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
स्तोत्रसंहिता 104 : 27 (ERVMR)
देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
स्तोत्रसंहिता 104 : 28 (ERVMR)
देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस. तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
स्तोत्रसंहिता 104 : 29 (ERVMR)
आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात. त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
स्तोत्रसंहिता 104 : 30 (ERVMR)
पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
स्तोत्रसंहिता 104 : 31 (ERVMR)
परमेश्वराचे वैभव सदैव राहो! परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
स्तोत्रसंहिता 104 : 32 (ERVMR)
परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
स्तोत्रसंहिता 104 : 33 (ERVMR)
मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
स्तोत्रसंहिता 104 : 34 (ERVMR)
मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
स्तोत्रसंहिता 104 : 35 (ERVMR)
पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: