स्तोत्रसंहिता 105 : 1 (ERVMR)
परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
स्तोत्रसंहिता 105 : 2 (ERVMR)
परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
स्तोत्रसंहिता 105 : 3 (ERVMR)
परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
स्तोत्रसंहिता 105 : 4 (ERVMR)
शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
स्तोत्रसंहिता 105 : 5 (ERVMR)
तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
स्तोत्रसंहिता 105 : 6 (ERVMR)
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
स्तोत्रसंहिता 105 : 7 (ERVMR)
परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावर राज्य करतो.
स्तोत्रसंहिता 105 : 8 (ERVMR)
परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
स्तोत्रसंहिता 105 : 9 (ERVMR)
देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इसहाकला वचन दिले.
स्तोत्रसंहिता 105 : 10 (ERVMR)
नंतर त्याने याकोबासाठी नियम केला. देवाने इस्राएल बरोबर करार केला. तो सदैव राहील.
स्तोत्रसंहिता 105 : 11 (ERVMR)
देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
स्तोत्रसंहिता 105 : 12 (ERVMR)
अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
स्तोत्रसंहिता 105 : 13 (ERVMR)
ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
स्तोत्रसंहिता 105 : 14 (ERVMR)
पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही. देवाने राजांना त्यांना दु:ख न देण्याची ताकीद दिली.
स्तोत्रसंहिता 105 : 15 (ERVMR)
देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दु:ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
स्तोत्रसंहिता 105 : 16 (ERVMR)
देवाने त्या देशात दुष्काळ आणला. लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
स्तोत्रसंहिता 105 : 17 (ERVMR)
पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले. योसेफ गुलाम सारखा विकला गेला.
स्तोत्रसंहिता 105 : 18 (ERVMR)
त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले. त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
स्तोत्रसंहिता 105 : 19 (ERVMR)
योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.
स्तोत्रसंहिता 105 : 20 (ERVMR)
तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.
स्तोत्रसंहिता 105 : 21 (ERVMR)
त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
स्तोत्रसंहिता 105 : 22 (ERVMR)
योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.
स्तोत्रसंहिता 105 : 23 (ERVMR)
नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.
स्तोत्रसंहिता 105 : 24 (ERVMR)
याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
स्तोत्रसंहिता 105 : 25 (ERVMR)
म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
स्तोत्रसंहिता 105 : 26 (ERVMR)
म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
स्तोत्रसंहिता 105 : 27 (ERVMR)
देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
स्तोत्रसंहिता 105 : 28 (ERVMR)
देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
स्तोत्रसंहिता 105 : 29 (ERVMR)
म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.
स्तोत्रसंहिता 105 : 30 (ERVMR)
त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
स्तोत्रसंहिता 105 : 31 (ERVMR)
देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
स्तोत्रसंहिता 105 : 32 (ERVMR)
देवाने पावसाचे गारात रुपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या.
स्तोत्रसंहिता 105 : 33 (ERVMR)
देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
स्तोत्रसंहिता 105 : 34 (ERVMR)
देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
स्तोत्रसंहिता 105 : 35 (ERVMR)
टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
स्तोत्रसंहिता 105 : 36 (ERVMR)
आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
स्तोत्रसंहिता 105 : 37 (ERVMR)
नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
स्तोत्रसंहिता 105 : 38 (ERVMR)
देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
स्तोत्रसंहिता 105 : 39 (ERVMR)
देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
स्तोत्रसंहिता 105 : 40 (ERVMR)
लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले. देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
स्तोत्रसंहिता 105 : 41 (ERVMR)
देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली.
स्तोत्रसंहिता 105 : 42 (ERVMR)
देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
स्तोत्रसंहिता 105 : 43 (ERVMR)
देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले. लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
स्तोत्रसंहिता 105 : 44 (ERVMR)
देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
स्तोत्रसंहिता 105 : 45 (ERVMR)
देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯