स्तोत्रसंहिता 111 : 1 (ERVMR)
परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
स्तोत्रसंहिता 111 : 2 (ERVMR)
परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात.
स्तोत्रसंहिता 111 : 3 (ERVMR)
देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
स्तोत्रसंहिता 111 : 4 (ERVMR)
परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
स्तोत्रसंहिता 111 : 5 (ERVMR)
देव त्याच्या भक्तांना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
स्तोत्रसंहिता 111 : 6 (ERVMR)
देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
स्तोत्रसंहिता 111 : 7 (ERVMR)
देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
स्तोत्रसंहिता 111 : 8 (ERVMR)
देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
स्तोत्रसंहिता 111 : 9 (ERVMR)
देव आपल्या माणसांना वाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
स्तोत्रसंहिता 111 : 10 (ERVMR)
शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
❮
❯