स्तोत्रसंहिता 113 : 1 (ERVMR)
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
स्तोत्रसंहिता 113 : 2 (ERVMR)
परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
स्तोत्रसंहिता 113 : 3 (ERVMR)
पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
स्तोत्रसंहिता 113 : 4 (ERVMR)
परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
स्तोत्रसंहिता 113 : 5 (ERVMR)
कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो.
स्तोत्रसंहिता 113 : 6 (ERVMR)
देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
स्तोत्रसंहिता 113 : 7 (ERVMR)
देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
स्तोत्रसंहिता 113 : 8 (ERVMR)
आणि देव त्या लोकांना महत्व देतो. देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
स्तोत्रसंहिता 113 : 9 (ERVMR)
स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯