स्तोत्रसंहिता 119 : 1 (ERVMR)
शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
स्तोत्रसंहिता 119 : 2 (ERVMR)
जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत. ते परमेश्वराच्या आज्ञा मानापासून पाळतात.
स्तोत्रसंहिता 119 : 3 (ERVMR)
ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत. ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
स्तोत्रसंहिता 119 : 4 (ERVMR)
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
स्तोत्रसंहिता 119 : 5 (ERVMR)
परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
स्तोत्रसंहिता 119 : 6 (ERVMR)
तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 7 (ERVMR)
मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
स्तोत्रसंहिता 119 : 8 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन. तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 9 (ERVMR)
तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
स्तोत्रसंहिता 119 : 10 (ERVMR)
मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 11 (ERVMR)
मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 12 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे कल्याण असो मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 13 (ERVMR)
मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
स्तोत्रसंहिता 119 : 14 (ERVMR)
तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 15 (ERVMR)
मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पध्दत आचरेन.
स्तोत्रसंहिता 119 : 16 (ERVMR)
मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 17 (ERVMR)
माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन. आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
स्तोत्रसंहिता 119 : 18 (ERVMR)
परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 19 (ERVMR)
मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 20 (ERVMR)
तू घेतलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
स्तोत्रसंहिता 119 : 21 (ERVMR)
परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
स्तोत्रसंहिता 119 : 22 (ERVMR)
मला शरम वाटू देऊ नकोस. मला लाज आणू नकोस. मी तुझा करार पाळला आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 23 (ERVMR)
नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात. पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 24 (ERVMR)
तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 25 (ERVMR)
मी लवकरच मरणार आहे. परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 26 (ERVMR)
मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस. आता मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 27 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर. तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेस त्या मला अभ्यासू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 28 (ERVMR)
मी खिन्न आणि दमलेलो आहे. आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
स्तोत्रसंहिता 119 : 29 (ERVMR)
परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.
स्तोत्रसंहिता 119 : 30 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 31 (ERVMR)
मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो. परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 32 (ERVMR)
मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन. परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.
स्तोत्रसंहिता 119 : 33 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 34 (ERVMR)
मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 35 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो.
स्तोत्रसंहिता 119 : 36 (ERVMR)
श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 37 (ERVMR)
परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टीं कडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 38 (ERVMR)
तू जे कबूल केलेस ते तुझ्या सेवकासाठी कर. मग लोक तुला मान देतील.
स्तोत्रसंहिता 119 : 39 (ERVMR)
परमेश्वरा, मला ज्या शरमेची भीती वाटते ती घेऊन जा. तुझे शहाणपणाचे निर्णय चांगले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 40 (ERVMR)
बघ, मला तुझ्या आज्ञा आवडतात. मला चांगले वागव आणि मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 41 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव. कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.
स्तोत्रसंहिता 119 : 42 (ERVMR)
त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल. परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 43 (ERVMR)
मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 44 (ERVMR)
परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.
स्तोत्रसंहिता 119 : 45 (ERVMR)
म्हणजे मी मुक्त होईन का? कारण मी तुझे नियम पाळायचा आटोकाट प्रयत्न करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 46 (ERVMR)
मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 47 (ERVMR)
मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.
स्तोत्रसंहिता 119 : 48 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो. मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 49 (ERVMR)
परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
स्तोत्रसंहिता 119 : 50 (ERVMR)
मी पीडित होतो, दु:खी होतो. आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
स्तोत्रसंहिता 119 : 51 (ERVMR)
जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 52 (ERVMR)
मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो. परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
स्तोत्रसंहिता 119 : 53 (ERVMR)
दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
स्तोत्रसंहिता 119 : 54 (ERVMR)
घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 55 (ERVMR)
परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव आणि तुझी शिकवण आठवते.
स्तोत्रसंहिता 119 : 56 (ERVMR)
असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 57 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे, असा निर्णय मी घेतला आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 58 (ERVMR)
परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.
स्तोत्रसंहिता 119 : 59 (ERVMR)
मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.
स्तोत्रसंहिता 119 : 60 (ERVMR)
अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
स्तोत्रसंहिता 119 : 61 (ERVMR)
वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 62 (ERVMR)
मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
स्तोत्रसंहिता 119 : 63 (ERVMR)
जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 64 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते. मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 65 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास. तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास.
स्तोत्रसंहिता 119 : 66 (ERVMR)
परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 67 (ERVMR)
दु:ख सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 68 (ERVMR)
देवा, तू चांगला आहेस आणि तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 69 (ERVMR)
जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोट सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.
स्तोत्रसंहिता 119 : 70 (ERVMR)
ते लोक फार मूर्ख आहेत पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 71 (ERVMR)
मी दु:ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
स्तोत्रसंहिता 119 : 72 (ERVMR)
परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 73 (ERVMR)
परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस. तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 74 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 75 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
स्तोत्रसंहिता 119 : 76 (ERVMR)
आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
स्तोत्रसंहिता 119 : 77 (ERVMR)
परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे. मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 78 (ERVMR)
जे लोक स्व:तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशीमी आशा करतो. परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 79 (ERVMR)
तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करु शकतील.
स्तोत्रसंहिता 119 : 80 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे म्हणजे मला लाज वाटणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 81 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 82 (ERVMR)
तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत. परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?
स्तोत्रसंहिता 119 : 83 (ERVMR)
मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो तरी मी तुझे नियम विसरणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 84 (ERVMR)
मी किती काळ जगणार आहे? परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात. त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
स्तोत्रसंहिता 119 : 85 (ERVMR)
काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 86 (ERVMR)
परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात. माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली. मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 119 : 87 (ERVMR)
त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला. पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 88 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे. तू जे सांगशील ते मी करेन.
स्तोत्रसंहिता 119 : 89 (ERVMR)
परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
स्तोत्रसंहिता 119 : 90 (ERVMR)
तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 91 (ERVMR)
तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
स्तोत्रसंहिता 119 : 92 (ERVMR)
जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
स्तोत्रसंहिता 119 : 93 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
स्तोत्रसंहिता 119 : 94 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 95 (ERVMR)
दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला. पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
स्तोत्रसंहिता 119 : 96 (ERVMR)
तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.
स्तोत्रसंहिता 119 : 97 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
स्तोत्रसंहिता 119 : 98 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात. तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
स्तोत्रसंहिता 119 : 99 (ERVMR)
मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे. कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 100 (ERVMR)
जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 101 (ERVMR)
तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
स्तोत्रसंहिता 119 : 102 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 103 (ERVMR)
माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 104 (ERVMR)
तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 105 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात.
स्तोत्रसंहिता 119 : 106 (ERVMR)
तुझे नियम चांगले आहेत. मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 107 (ERVMR)
परमेश्वरा, मी खूप काळ द:ुख भोगले आहे. कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 108 (ERVMR)
परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 109 (ERVMR)
माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 110 (ERVMR)
दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 111 (ERVMR)
परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.
स्तोत्रसंहिता 119 : 112 (ERVMR)
मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 113 (ERVMR)
परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 114 (ERVMR)
मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 115 (ERVMR)
परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 116 (ERVMR)
परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 117 (ERVMR)
परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल. मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 118 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
स्तोत्रसंहिता 119 : 119 (ERVMR)
परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
स्तोत्रसंहिता 119 : 120 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
स्तोत्रसंहिता 119 : 121 (ERVMR)
जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
स्तोत्रसंहिता 119 : 122 (ERVMR)
माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 123 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 124 (ERVMR)
मी तुझा सेवक आहे. मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 125 (ERVMR)
मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
स्तोत्रसंहिता 119 : 126 (ERVMR)
परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 127 (ERVMR)
परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.
स्तोत्रसंहिता 119 : 128 (ERVMR)
मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. मला खोटी शिकवण आवडत नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 129 (ERVMR)
परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे म्हणूनच मी तो पाळतो.
स्तोत्रसंहिता 119 : 130 (ERVMR)
जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
स्तोत्रसंहिता 119 : 131 (ERVMR)
परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 132 (ERVMR)
देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग. जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
स्तोत्रसंहिता 119 : 133 (ERVMR)
परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 119 : 134 (ERVMR)
परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 135 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या सेवकाचा स्वीकार कर आणि मला तुझे नियम शिकव.
स्तोत्रसंहिता 119 : 136 (ERVMR)
लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 137 (ERVMR)
परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझे नियम योग्य आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 138 (ERVMR)
तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
स्तोत्रसंहिता 119 : 139 (ERVMR)
माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 140 (ERVMR)
परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 141 (ERVMR)
मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत. पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 142 (ERVMR)
परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 143 (ERVMR)
माझ्यावर खूप संकटे आली आणि वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
स्तोत्रसंहिता 119 : 144 (ERVMR)
तुझा करार नेहमीच चांगला असतो. तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
स्तोत्रसंहिता 119 : 145 (ERVMR)
मी अगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा, मला उत्तर दे मी तुझ्या आज्ञा पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 146 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उध्दार करआणि मी तुझा करार पाळीन.
स्तोत्रसंहिता 119 : 147 (ERVMR)
तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो.
स्तोत्रसंहिता 119 : 148 (ERVMR)
तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो.
स्तोत्रसंहिता 119 : 149 (ERVMR)
तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 150 (ERVMR)
लोक माझ्याविरुध्द वाईट योजना आखीत आहेत ते लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 151 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझ्या खूप जवळ आहेस आणि तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 152 (ERVMR)
मी खूप पूर्वी तुझ्या करारावरुन शिकलो की तुझी शिकवण सदैव राहाणार आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 153 (ERVMR)
परमेश्वरा, माझे दु:ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 154 (ERVMR)
परमेश्वरा, माझ्यासाठी माझी लढाई लढ. तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 155 (ERVMR)
दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण ते तुझे नियम पाळत नाहीत.
स्तोत्रसंहिता 119 : 156 (ERVMR)
परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस. तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 157 (ERVMR)
मला दु:ख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत पण मी तुझ्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 158 (ERVMR)
मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 159 (ERVMR)
बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.
स्तोत्रसंहिता 119 : 160 (ERVMR)
परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
स्तोत्रसंहिता 119 : 161 (ERVMR)
शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
स्तोत्रसंहिता 119 : 162 (ERVMR)
परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
स्तोत्रसंहिता 119 : 163 (ERVMR)
मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.
स्तोत्रसंहिता 119 : 164 (ERVMR)
मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो.
स्तोत्रसंहिता 119 : 165 (ERVMR)
जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
स्तोत्रसंहिता 119 : 166 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 167 (ERVMR)
मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात.
स्तोत्रसंहिता 119 : 168 (ERVMR)
मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या. परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे.
स्तोत्रसंहिता 119 : 169 (ERVMR)
परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक. तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर.
स्तोत्रसंहिता 119 : 170 (ERVMR)
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर.
स्तोत्रसंहिता 119 : 171 (ERVMR)
तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.
स्तोत्रसंहिता 119 : 172 (ERVMR)
तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे. परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.
स्तोत्रसंहिता 119 : 173 (ERVMR)
परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले.
स्तोत्रसंहिता 119 : 174 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते.
स्तोत्रसंहिता 119 : 175 (ERVMR)
परमेश्वरा, मला जगू दे आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे.
स्तोत्रसंहिता 119 : 176 (ERVMR)
मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो. परमेश्वरा, मला शोधाला ये. मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176