स्तोत्रसंहिता 120 : 1 (ERVMR)
मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.
स्तोत्रसंहिता 120 : 2 (ERVMR)
परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
स्तोत्रसंहिता 120 : 3 (ERVMR)
खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
स्तोत्रसंहिता 120 : 4 (ERVMR)
सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
स्तोत्रसंहिता 120 : 5 (ERVMR)
खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
स्तोत्रसंहिता 120 : 6 (ERVMR)
शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.
स्तोत्रसंहिता 120 : 7 (ERVMR)
मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: