स्तोत्रसंहिता 127 : 1 (ERVMR)
जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
स्तोत्रसंहिता 127 : 2 (ERVMR)
भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
स्तोत्रसंहिता 127 : 3 (ERVMR)
मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
स्तोत्रसंहिता 127 : 4 (ERVMR)
तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.
स्तोत्रसंहिता 127 : 5 (ERVMR)
जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.

1 2 3 4 5

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: