स्तोत्रसंहिता 129 : 1 (ERVMR)
“मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
स्तोत्रसंहिता 129 : 2 (ERVMR)
मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
स्तोत्रसंहिता 129 : 3 (ERVMR)
माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
स्तोत्रसंहिता 129 : 4 (ERVMR)
पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
स्तोत्रसंहिता 129 : 5 (ERVMR)
जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
स्तोत्रसंहिता 129 : 6 (ERVMR)
ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
स्तोत्रसंहिता 129 : 7 (ERVMR)
ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
स्तोत्रसंहिता 129 : 8 (ERVMR)
त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
❮
❯