स्तोत्रसंहिता 137 : 1 (ERVMR)
आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.
स्तोत्रसंहिता 137 : 2 (ERVMR)
आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
स्तोत्रसंहिता 137 : 3 (ERVMR)
बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
स्तोत्रसंहिता 137 : 4 (ERVMR)
परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
स्तोत्रसंहिता 137 : 5 (ERVMR)
यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
स्तोत्रसंहिता 137 : 6 (ERVMR)
यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
स्तोत्रसंहिता 137 : 7 (ERVMR)
यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
स्तोत्रसंहिता 137 : 8 (ERVMR)
बाबेल, तुझा नाश होईल. जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल. तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
स्तोत्रसंहिता 137 : 9 (ERVMR)
जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.

1 2 3 4 5 6 7 8 9