स्तोत्रसंहिता 14 : 1 (ERVMR)
दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
स्तोत्रसंहिता 14 : 2 (ERVMR)
परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
स्तोत्रसंहिता 14 : 3 (ERVMR)
परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
स्तोत्रसंहिता 14 : 4 (ERVMR)
दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायला खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
स्तोत्रसंहिता 14 : 5 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 14 : 6 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 14 : 7 (ERVMR)
सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
❮
❯