स्तोत्रसंहिता 143 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या पार्थनेकडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
स्तोत्रसंहिता 143 : 2 (ERVMR)
माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस. कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही.
स्तोत्रसंहिता 143 : 3 (ERVMR)
पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत. त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे. ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत.
स्तोत्रसंहिता 143 : 4 (ERVMR)
मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे. माझा धीर सुटत चालला आहे.
स्तोत्रसंहिता 143 : 5 (ERVMR)
पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत. तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो. तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे.
स्तोत्रसंहिता 143 : 6 (ERVMR)
परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.
स्तोत्रसंहिता 143 : 7 (ERVMR)
परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 143 : 8 (ERVMR)
परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
स्तोत्रसंहिता 143 : 9 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 143 : 10 (ERVMR)
मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव. तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.
स्तोत्रसंहिता 143 : 11 (ERVMR)
परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 143 : 12 (ERVMR)
परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव. जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा पराभव कर. का? कारण मी तुझा सेवक आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12