स्तोत्रसंहिता 15 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
स्तोत्रसंहिता 15 : 2 (ERVMR)
जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो, अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल.
स्तोत्रसंहिता 15 : 3 (ERVMR)
तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वतच्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही. त्यांना त्रास होईल असे काही करत नाही. तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
स्तोत्रसंहिता 15 : 4 (ERVMR)
तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही. परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो. त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल, तर तो त्या वचनाला जागतो.
स्तोत्रसंहिता 15 : 5 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
❮
❯