स्तोत्रसंहिता 2 : 1 (ERVMR)
इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?
स्तोत्रसंहिता 2 : 2 (ERVMR)
त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले.
स्तोत्रसंहिता 2 : 3 (ERVMR)
ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.”
स्तोत्रसंहिता 2 : 4 (ERVMR)
परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.
स्तोत्रसंहिता 2 : 5 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 2 : 6 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 2 : 7 (ERVMR)
आता मी तुम्हाला परमेश्वरराच्या कराराविषयी सांगतो परमेश्वर मला म्हणाला, “आज मी तुझा बाप झालो! आणि तू माझा मुलगा झालास.
स्तोत्रसंहिता 2 : 8 (ERVMR)
जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
स्तोत्रसंहिता 2 : 9 (ERVMR)
लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा नाश करते तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू सकशील.”
स्तोत्रसंहिता 2 : 10 (ERVMR)
म्हणून राजांनो तुम्ही शहाणे व्हा राज्यकर्त्यांनो हा धडा शिका.
स्तोत्रसंहिता 2 : 11 (ERVMR)
परमेश्वराच्या आज्ञांचे भीतीयुक्त पालन करा.
स्तोत्रसंहिता 2 : 12 (ERVMR)
तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12