स्तोत्रसंहिता 21 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
स्तोत्रसंहिता 21 : 2 (ERVMR)
राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
स्तोत्रसंहिता 21 : 3 (ERVMR)
परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
स्तोत्रसंहिता 21 : 4 (ERVMR)
त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
स्तोत्रसंहिता 21 : 5 (ERVMR)
तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस. तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
स्तोत्रसंहिता 21 : 6 (ERVMR)
देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
स्तोत्रसंहिता 21 : 7 (ERVMR)
राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
स्तोत्रसंहिता 21 : 8 (ERVMR)
देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
स्तोत्रसंहिता 21 : 9 (ERVMR)
भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
स्तोत्रसंहिता 21 : 10 (ERVMR)
त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरुन निघून जातील.
स्तोत्रसंहिता 21 : 11 (ERVMR)
का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
स्तोत्रसंहिता 21 : 12 (ERVMR)
परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस. तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस. तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
स्तोत्रसंहिता 21 : 13 (ERVMR)
हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13