स्तोत्रसंहिता 29 : 1 (ERVMR)
देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 29 : 2 (ERVMR)
परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
स्तोत्रसंहिता 29 : 3 (ERVMR)
परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
स्तोत्रसंहिता 29 : 4 (ERVMR)
परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
स्तोत्रसंहिता 29 : 5 (ERVMR)
परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
स्तोत्रसंहिता 29 : 6 (ERVMR)
परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
स्तोत्रसंहिता 29 : 7 (ERVMR)
परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
स्तोत्रसंहिता 29 : 8 (ERVMR)
परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
स्तोत्रसंहिता 29 : 9 (ERVMR)
परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
स्तोत्रसंहिता 29 : 10 (ERVMR)
महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
स्तोत्रसंहिता 29 : 11 (ERVMR)
परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11