स्तोत्रसंहिता 36 : 1 (ERVMR)
वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
स्तोत्रसंहिता 36 : 2 (ERVMR)
तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो त्याला स्वतच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 3 (ERVMR)
त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 4 (ERVMR)
सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 5 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
स्तोत्रसंहिता 36 : 6 (ERVMR)
परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
स्तोत्रसंहिता 36 : 7 (ERVMR)
तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
स्तोत्रसंहिता 36 : 8 (ERVMR)
परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
स्तोत्रसंहिता 36 : 9 (ERVMR)
परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
स्तोत्रसंहिता 36 : 10 (ERVMR)
परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.
स्तोत्रसंहिता 36 : 11 (ERVMR)
परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 36 : 12 (ERVMR)
त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12