स्तोत्रसंहिता 38 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 38 : 2 (ERVMR)
परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
स्तोत्रसंहिता 38 : 3 (ERVMR)
तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
स्तोत्रसंहिता 38 : 4 (ERVMR)
मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 5 (ERVMR)
मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 6 (ERVMR)
मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो.
स्तोत्रसंहिता 38 : 7 (ERVMR)
मला ताप आला आहे आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 8 (ERVMR)
मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 9 (ERVMR)
प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
स्तोत्रसंहिता 38 : 10 (ERVMR)
माझे हृदय धडधडत आहे. माझी शक्ती निघून गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 11 (ERVMR)
माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
स्तोत्रसंहिता 38 : 12 (ERVMR)
माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
स्तोत्रसंहिता 38 : 13 (ERVMR)
परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 14 (ERVMR)
लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 15 (ERVMR)
म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर. देवा, तूच माझ्यावतीने बोल.
स्तोत्रसंहिता 38 : 16 (ERVMR)
मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
स्तोत्रसंहिता 38 : 17 (ERVMR)
मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे. हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 18 (ERVMR)
परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 19 (ERVMR)
माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 20 (ERVMR)
माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
स्तोत्रसंहिता 38 : 21 (ERVMR)
परमेश्वरा, मला सोडू नकोस. देवा माझ्याजवळ राहा.
स्तोत्रसंहिता 38 : 22 (ERVMR)
लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचव!

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: