स्तोत्रसंहिता 45 : 1 (ERVMR)
मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
स्तोत्रसंहिता 45 : 2 (ERVMR)
तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
स्तोत्रसंहिता 45 : 3 (ERVMR)
तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान, तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.
स्तोत्रसंहिता 45 : 4 (ERVMR)
तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
स्तोत्रसंहिता 45 : 5 (ERVMR)
तुझे बाण तीक्ष्ण आहेत. तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
स्तोत्रसंहिता 45 : 6 (ERVMR)
देवा तुझे सिंहासन नेहमीसाठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
स्तोत्रसंहिता 45 : 7 (ERVMR)
तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा, तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा राजा निवडले.
स्तोत्रसंहिता 45 : 8 (ERVMR)
तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
स्तोत्रसंहिता 45 : 9 (ERVMR)
राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
स्तोत्रसंहिता 45 : 10 (ERVMR)
मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
स्तोत्रसंहिता 45 : 11 (ERVMR)
राजाला तुझे सौंदर्य आवडते. तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल. तू त्याला मान देशील.
स्तोत्रसंहिता 45 : 12 (ERVMR)
सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील. श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
स्तोत्रसंहिता 45 : 13 (ERVMR)
राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
स्तोत्रसंहिता 45 : 14 (ERVMR)
सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते. तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
स्तोत्रसंहिता 45 : 15 (ERVMR)
त्या अतिशय आनंदात आहेत. आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
स्तोत्रसंहिता 45 : 16 (ERVMR)
राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील. तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
स्तोत्रसंहिता 45 : 17 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17