स्तोत्रसंहिता 5 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे.
स्तोत्रसंहिता 5 : 2 (ERVMR)
माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक.
स्तोत्रसंहिता 5 : 3 (ERVMR)
परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
स्तोत्रसंहिता 5 : 4 (ERVMR)
देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 5 : 5 (ERVMR)
मूर्ख तुझ्याकडे येऊ शकत नाहीत. जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस.
स्तोत्रसंहिता 5 : 6 (ERVMR)
जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.
स्तोत्रसंहिता 5 : 7 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन. मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन.
स्तोत्रसंहिता 5 : 8 (ERVMR)
परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात. म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव.
स्तोत्रसंहिता 5 : 9 (ERVMR)
ते लोक खरे बोलत नाहीत. ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.
स्तोत्रसंहिता 5 : 10 (ERVMR)
देवा, तू त्यांना शिक्षा कर. त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत. म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर.
स्तोत्रसंहिता 5 : 11 (ERVMR)
परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे. त्यांना कायमचे सुखी कर. देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.
स्तोत्रसंहिता 5 : 12 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12