स्तोत्रसंहिता 55 : 1 (ERVMR)
देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
स्तोत्रसंहिता 55 : 2 (ERVMR)
देवा, कृपा करुन माझे ऐक आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
स्तोत्रसंहिता 55 : 3 (ERVMR)
माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
स्तोत्रसंहिता 55 : 4 (ERVMR)
माझे ह्दय धडधडत आहे मी खूप घाबरलो आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 5 (ERVMR)
मी भीतीने थरथर कापत आहे. मी भयभीत झालो आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 6 (ERVMR)
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
स्तोत्रसंहिता 55 : 7 (ERVMR)
मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
स्तोत्रसंहिता 55 : 8 (ERVMR)
मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
स्तोत्रसंहिता 55 : 9 (ERVMR)
प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
स्तोत्रसंहिता 55 : 10 (ERVMR)
माझ्या भोवती संकटे आहेत. दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
स्तोत्रसंहिता 55 : 11 (ERVMR)
रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत. लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.
स्तोत्रसंहिता 55 : 12 (ERVMR)
जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.
स्तोत्रसंहिता 55 : 13 (ERVMR)
परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त.
स्तोत्रसंहिता 55 : 14 (ERVMR)
आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.
स्तोत्रसंहिता 55 : 15 (ERVMR)
माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे, जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते. का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
स्तोत्रसंहिता 55 : 16 (ERVMR)
मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 55 : 17 (ERVMR)
मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो. मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.
स्तोत्रसंहिता 55 : 18 (ERVMR)
मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.
स्तोत्रसंहिता 55 : 19 (ERVMR)
देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.
स्तोत्रसंहिता 55 : 20 (ERVMR)
माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत. ते देवाला घाबरत नाहीत. आणि त्याला मान ही देत नाहीत.
स्तोत्रसंहिता 55 : 21 (ERVMR)
माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
स्तोत्रसंहिता 55 : 22 (ERVMR)
माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.
स्तोत्रसंहिता 55 : 23 (ERVMR)
तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23