स्तोत्रसंहिता 56 : 1 (ERVMR)
देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
स्तोत्रसंहिता 56 : 2 (ERVMR)
माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
स्तोत्रसंहिता 56 : 3 (ERVMR)
मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
स्तोत्रसंहिता 56 : 4 (ERVMR)
माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही. लोक मला त्रास देऊ शकत नाहीत. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.
स्तोत्रसंहिता 56 : 5 (ERVMR)
माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.
स्तोत्रसंहिता 56 : 6 (ERVMR)
ते एकत्र लपतात आणि मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.
स्तोत्रसंहिता 56 : 7 (ERVMR)
देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
स्तोत्रसंहिता 56 : 8 (ERVMR)
मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
स्तोत्रसंहिता 56 : 9 (ERVMR)
म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
स्तोत्रसंहिता 56 : 10 (ERVMR)
मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो. परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.
स्तोत्रसंहिता 56 : 11 (ERVMR)
माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 56 : 12 (ERVMR)
देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
स्तोत्रसंहिता 56 : 13 (ERVMR)
का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस, तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: