स्तोत्रसंहिता 6 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
स्तोत्रसंहिता 6 : 2 (ERVMR)
परमेश्वरा माझ्यावर दया कर. मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.
स्तोत्रसंहिता 6 : 3 (ERVMR)
माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?
स्तोत्रसंहिता 6 : 4 (ERVMR)
परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे. तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.
स्तोत्रसंहिता 6 : 5 (ERVMR)
मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.
स्तोत्रसंहिता 6 : 6 (ERVMR)
परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.
स्तोत्रसंहिता 6 : 7 (ERVMR)
माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 6 : 8 (ERVMR)
वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
स्तोत्रसंहिता 6 : 9 (ERVMR)
परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
स्तोत्रसंहिता 6 : 10 (ERVMR)
माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.
❮
❯