स्तोत्रसंहिता 66 : 1 (ERVMR)
पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
स्तोत्रसंहिता 66 : 2 (ERVMR)
देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
स्तोत्रसंहिता 66 : 3 (ERVMR)
त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
स्तोत्रसंहिता 66 : 4 (ERVMR)
सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
स्तोत्रसंहिता 66 : 5 (ERVMR)
देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात.
स्तोत्रसंहिता 66 : 6 (ERVMR)
देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
स्तोत्रसंहिता 66 : 7 (ERVMR)
देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
स्तोत्रसंहिता 66 : 8 (ERVMR)
लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
स्तोत्रसंहिता 66 : 9 (ERVMR)
देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.
स्तोत्रसंहिता 66 : 10 (ERVMR)
लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
स्तोत्रसंहिता 66 : 11 (ERVMR)
देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
स्तोत्रसंहिता 66 : 12 (ERVMR)
तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
स्तोत्रसंहिता 66 : 13 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 66 : 14 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 66 : 15 (ERVMR)
मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
स्तोत्रसंहिता 66 : 16 (ERVMR)
देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
स्तोत्रसंहिता 66 : 17 (ERVMR)
मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली.
स्तोत्रसंहिता 66 : 18 (ERVMR)
माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले.
स्तोत्रसंहिता 66 : 19 (ERVMR)
देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.
स्तोत्रसंहिता 66 : 20 (ERVMR)
देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20