स्तोत्रसंहिता 76 : 1 (ERVMR)
यहुदातील लोकांना देव माहीत आहे. इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
स्तोत्रसंहिता 76 : 2 (ERVMR)
देवाचे मंदिर शालेममध्ये आहे. देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
स्तोत्रसंहिता 76 : 3 (ERVMR)
देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रांचा नाश केला.
स्तोत्रसंहिता 76 : 4 (ERVMR)
देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
स्तोत्रसंहिता 76 : 5 (ERVMR)
त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते. परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत. त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत. या शूर सैनिकांपैकी कुणीही स्व:त चे रक्षण करु शकला नाही.
स्तोत्रसंहिता 76 : 6 (ERVMR)
याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
स्तोत्रसंहिता 76 : 7 (ERVMR)
देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 76 : 8 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 76 : 9 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
स्तोत्रसंहिता 76 : 10 (ERVMR)
तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
स्तोत्रसंहिता 76 : 11 (ERVMR)
लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत. आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते देवासाठी भेटी आणतात.
स्तोत्रसंहिता 76 : 12 (ERVMR)
देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो. पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12