स्तोत्रसंहिता 82 : 1 (ERVMR)
देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
स्तोत्रसंहिता 82 : 2 (ERVMR)
देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
स्तोत्रसंहिता 82 : 3 (ERVMR)
“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 82 : 4 (ERVMR)
त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
स्तोत्रसंहिता 82 : 5 (ERVMR)
“काय घडते आहे ते त्यांना कळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
स्तोत्रसंहिता 82 : 6 (ERVMR)
मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
स्तोत्रसंहिता 82 : 7 (ERVMR)
परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
स्तोत्रसंहिता 82 : 8 (ERVMR)
देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

1 2 3 4 5 6 7 8