स्तोत्रसंहिता 88 : 1 (ERVMR)
परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
स्तोत्रसंहिता 88 : 2 (ERVMR)
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
स्तोत्रसंहिता 88 : 3 (ERVMR)
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे.
स्तोत्रसंहिता 88 : 4 (ERVMR)
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
स्तोत्रसंहिता 88 : 5 (ERVMR)
मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
स्तोत्रसंहिता 88 : 6 (ERVMR)
तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
स्तोत्रसंहिता 88 : 7 (ERVMR)
देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस.
स्तोत्रसंहिता 88 : 8 (ERVMR)
माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 88 : 9 (ERVMR)
अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
स्तोत्रसंहिता 88 : 10 (ERVMR)
परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.
स्तोत्रसंहिता 88 : 11 (ERVMR)
थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 88 : 12 (ERVMR)
अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
स्तोत्रसंहिता 88 : 13 (ERVMR)
परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
स्तोत्रसंहिता 88 : 14 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस?
स्तोत्रसंहिता 88 : 15 (ERVMR)
मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
स्तोत्रसंहिता 88 : 16 (ERVMR)
परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे.
स्तोत्रसंहिता 88 : 17 (ERVMR)
दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
स्तोत्रसंहिता 88 : 18 (ERVMR)
आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18