स्तोत्रसंहिता 91 : 1 (ERVMR)
तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
स्तोत्रसंहिता 91 : 2 (ERVMR)
मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
स्तोत्रसंहिता 91 : 3 (ERVMR)
देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
स्तोत्रसंहिता 91 : 4 (ERVMR)
तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
स्तोत्रसंहिता 91 : 5 (ERVMR)
रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
स्तोत्रसंहिता 91 : 6 (ERVMR)
अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
स्तोत्रसंहिता 91 : 7 (ERVMR)
तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 91 : 8 (ERVMR)
तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.
स्तोत्रसंहिता 91 : 9 (ERVMR)
का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
स्तोत्रसंहिता 91 : 10 (ERVMR)
तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
स्तोत्रसंहिता 91 : 11 (ERVMR)
देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
स्तोत्रसंहिता 91 : 12 (ERVMR)
तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
स्तोत्रसंहिता 91 : 13 (ERVMR)
तुमच्याजवळ सिंहावरुन आणि विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
स्तोत्रसंहिता 91 : 14 (ERVMR)
परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
स्तोत्रसंहिता 91 : 15 (ERVMR)
माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
स्तोत्रसंहिता 91 : 16 (ERVMR)
मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16