स्तोत्रसंहिता 93 : 1 (ERVMR)
परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.
स्तोत्रसंहिता 93 : 2 (ERVMR)
देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस.
स्तोत्रसंहिता 93 : 3 (ERVMR)
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
स्तोत्रसंहिता 93 : 4 (ERVMR)
समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
स्तोत्रसंहिता 93 : 5 (ERVMR)
परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
❮
❯