स्तोत्रसंहिता 95 : 1 (ERVMR)
चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
स्तोत्रसंहिता 95 : 2 (ERVMR)
परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
स्तोत्रसंहिता 95 : 3 (ERVMR)
का? कराण परमेश्वर मोठा देव आहे, इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
स्तोत्रसंहिता 95 : 4 (ERVMR)
सगळ्यांत खोल दऱ्या आणि सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
स्तोत्रसंहिता 95 : 5 (ERVMR)
महासागरही त्याचाच आहे - त्यानेच तो निर्मिर्ण केला. देवाने स्व:तच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
स्तोत्रसंहिता 95 : 6 (ERVMR)
चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
स्तोत्रसंहिता 95 : 7 (ERVMR)
तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.
स्तोत्रसंहिता 95 : 8 (ERVMR)
देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 95 : 9 (ERVMR)
तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
स्तोत्रसंहिता 95 : 10 (ERVMR)
मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
स्तोत्रसंहिता 95 : 11 (ERVMR)
म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”
❮
❯