स्तोत्रसंहिता 97 : 1 (ERVMR)
परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
स्तोत्रसंहिता 97 : 2 (ERVMR)
परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
स्तोत्रसंहिता 97 : 3 (ERVMR)
अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.
स्तोत्रसंहिता 97 : 4 (ERVMR)
त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात.
स्तोत्रसंहिता 97 : 5 (ERVMR)
परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
स्तोत्रसंहिता 97 : 6 (ERVMR)
आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
स्तोत्रसंहिता 97 : 7 (ERVMR)
लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
स्तोत्रसंहिता 97 : 8 (ERVMR)
सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
स्तोत्रसंहिता 97 : 9 (ERVMR)
परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
स्तोत्रसंहिता 97 : 10 (ERVMR)
जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
स्तोत्रसंहिता 97 : 11 (ERVMR)
चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते.
स्तोत्रसंहिता 97 : 12 (ERVMR)
चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: