प्रकटीकरण 16 : 1 (ERVMR)
मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.”
प्रकटीकरण 16 : 2 (ERVMR)
पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.
प्रकटीकरण 16 : 3 (ERVMR)
दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले,
प्रकटीकरण 16 : 4 (ERVMR)
तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्यावझरे रक्तमय झाले.
प्रकटीकरण 16 : 5 (ERVMR)
मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले: “केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
प्रकटीकरण 16 : 6 (ERVMR)
लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस. कारण ते याच पात्रतेचे आहेत.”
प्रकटीकरण 16 : 7 (ERVMR)
त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की, “होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
प्रकटीकरण 16 : 8 (ERVMR)
चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती.
प्रकटीकरण 16 : 9 (ERVMR)
भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.
प्रकटीकरण 16 : 10 (ERVMR)
पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते.
प्रकटीकरण 16 : 11 (ERVMR)
लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.
प्रकटीकरण 16 : 12 (ERVMR)
सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला.
प्रकटीकरण 16 : 13 (ERVMR)
तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले.
प्रकटीकरण 16 : 14 (ERVMR)
हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.
प्रकटीकरण 16 : 15 (ERVMR)
“पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”
प्रकटीकरण 16 : 16 (ERVMR)
मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.
प्रकटीकरण 16 : 17 (ERVMR)
मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.”
प्रकटीकरण 16 : 18 (ERVMR)
मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता.
प्रकटीकरण 16 : 19 (ERVMR)
महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्ट झाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला.
प्रकटीकरण 16 : 20 (ERVMR)
प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले.
प्रकटीकरण 16 : 21 (ERVMR)
लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21