प्रकटीकरण 9 : 1 (ERVMR)
पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांग दऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली.
प्रकटीकरण 9 : 2 (ERVMR)
मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले
प्रकटीकरण 9 : 3 (ERVMR)
मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.
प्रकटीकरण 9 : 4 (ERVMR)
टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांना किंवा झाडांना हानि पोहचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांना सांगण्यात आले होते.
प्रकटीकरण 9 : 5 (ERVMR)
या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी पाच महिने वेळ दिला होता. अधिकार दिला होता. पण त्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंख मारल्यावर होतात तशा होत होत्या.
प्रकटीकरण 9 : 6 (ERVMR)
या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना तो सापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल पण मरण त्यांच्यापासून लपून राहील.
प्रकटीकरण 9 : 7 (ERVMR)
युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुगुटासारखे काही घातले होते. त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते.
प्रकटीकरण 9 : 8 (ERVMR)
त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
प्रकटीकरण 9 : 9 (ERVMR)
[This verse may not be a part of this translation]
प्रकटीकरण 9 : 10 (ERVMR)
त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना पाच महिने वेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती.
प्रकटीकरण 9 : 11 (ERVMR)
टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेत त्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.
प्रकटीकरण 9 : 12 (ERVMR)
पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.
प्रकटीकरण 9 : 13 (ERVMR)
सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासून येणारा आवाज ऐकला.
प्रकटीकरण 9 : 14 (ERVMR)
तो आवाज त्या सहाव्या दूताला ज्याच्याकडे कर्णा होता त्याला म्हणाला, “फरान नदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत सोड.”
प्रकटीकरण 9 : 15 (ERVMR)
ते चार देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवले होते. पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले.
प्रकटीकरण 9 : 16 (ERVMR)
घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 200,000,000 इतके घोडदळ होते.
प्रकटीकरण 9 : 17 (ERVMR)
माइया दृष्टान्तात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले, ते अशा प्रकारे दिसत होते: तांबड्या रंगाचे, गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण (चिल खत) होते. घोड्यांची मस्तके सिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती. घोड्यांच्या तोंडांतून अग्नि, धूर व गंधरस येत होते.
प्रकटीकरण 9 : 18 (ERVMR)
घोडयांच्या तोंडातून येणाऱ्या या तीन पीडा - अग्नि, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील एक तृतीयांश लोक मारले गेले.
प्रकटीकरण 9 : 19 (ERVMR)
घोड्यांची शाक्ति त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीतसुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांना जखमी करीत असत.
प्रकटीकरण 9 : 20 (ERVMR)
इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंत:करणे व जीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत, अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही.
प्रकटीकरण 9 : 21 (ERVMR)
या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंत:करणे बदलली नाहीत खून चेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: