1 इतिहास 15 : 1 (IRVMR)
{कोश यरूशलेमेस आणतात} [PS] दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
1 इतिहास 15 : 2 (IRVMR)
मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
1 इतिहास 15 : 3 (IRVMR)
मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले. [PE][PS]
1 इतिहास 15 : 4 (IRVMR)
दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले. [QBR]
1 इतिहास 15 : 5 (IRVMR)
कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती. [QBR]
1 इतिहास 15 : 6 (IRVMR)
मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती. [QBR]
1 इतिहास 15 : 7 (IRVMR)
गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती. [QBR]
1 इतिहास 15 : 8 (IRVMR)
अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते. [QBR]
1 इतिहास 15 : 9 (IRVMR)
हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते. [QBR]
1 इतिहास 15 : 10 (IRVMR)
उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती. [PE][PS]
1 इतिहास 15 : 11 (IRVMR)
दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
1 इतिहास 15 : 12 (IRVMR)
दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा. [PE][PS]
1 इतिहास 15 : 13 (IRVMR)
पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
1 इतिहास 15 : 14 (IRVMR)
यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
1 इतिहास 15 : 15 (IRVMR)
मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला. [PE][PS]
1 इतिहास 15 : 16 (IRVMR)
दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
1 इतिहास 15 : 17 (IRVMR)
लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
1 इतिहास 15 : 18 (IRVMR)
याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
1 इतिहास 15 : 19 (IRVMR)
हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
1 इतिहास 15 : 20 (IRVMR)
जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
1 इतिहास 15 : 21 (IRVMR)
मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते. [PE][PS]
1 इतिहास 15 : 22 (IRVMR)
लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
1 इतिहास 15 : 23 (IRVMR)
बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
1 इतिहास 15 : 24 (IRVMR)
शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते. [PE][PS]
1 इतिहास 15 : 25 (IRVMR)
अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
1 इतिहास 15 : 26 (IRVMR)
परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. [PE][PS]
1 इतिहास 15 : 27 (IRVMR)
कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
1 इतिहास 15 : 28 (IRVMR)
अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला. [PE][PS]
1 इतिहास 15 : 29 (IRVMR)
पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: