1 इतिहास 16 : 1 (IRVMR)
त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.
1 इतिहास 16 : 2 (IRVMR)
मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला.
1 इतिहास 16 : 3 (IRVMR)
मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.
1 इतिहास 16 : 4 (IRVMR)
मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
1 इतिहास 16 : 5 (IRVMR)
आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.
1 इतिहास 16 : 6 (IRVMR)
बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत.
1 इतिहास 16 : 7 (IRVMR)
दाविदाचे आभारप्रदर्शक स्तोत्र
स्तोत्र. 96:1-13; 105:1-15; 106:1, 47, 48
1 इतिहास 16 : 8 (IRVMR)
तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले. परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.
1 इतिहास 16 : 9 (IRVMR)
त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा. त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
1 इतिहास 16 : 10 (IRVMR)
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.
1 इतिहास 16 : 11 (IRVMR)
परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.
1 इतिहास 16 : 12 (IRVMR)
त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
1 इतिहास 16 : 13 (IRVMR)
त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,
1 इतिहास 16 : 14 (IRVMR)
तो परमेश्वर, आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
1 इतिहास 16 : 15 (IRVMR)
त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.
1 इतिहास 16 : 16 (IRVMR)
त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.
1 इतिहास 16 : 17 (IRVMR)
याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला.
1 इतिहास 16 : 18 (IRVMR)
तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.”
1 इतिहास 16 : 19 (IRVMR)
मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.
1 इतिहास 16 : 20 (IRVMR)
तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.
1 इतिहास 16 : 21 (IRVMR)
पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली.
1 इतिहास 16 : 22 (IRVMR)
तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
1 इतिहास 16 : 23 (IRVMR)
पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा.
1 इतिहास 16 : 24 (IRVMR)
त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा.
1 इतिहास 16 : 25 (IRVMR)
परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.
1 इतिहास 16 : 26 (IRVMR)
कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
1 इतिहास 16 : 27 (IRVMR)
महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत.
1 इतिहास 16 : 28 (IRVMR)
अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
1 इतिहास 16 : 29 (IRVMR)
परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
1 इतिहास 16 : 30 (IRVMR)
त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.
1 इतिहास 16 : 31 (IRVMR)
पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”
1 इतिहास 16 : 32 (IRVMR)
समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.
1 इतिहास 16 : 33 (IRVMR)
अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
1 इतिहास 16 : 34 (IRVMR)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
1 इतिहास 16 : 35 (IRVMR)
आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार. आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”
1 इतिहास 16 : 36 (IRVMR)
इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
1 इतिहास 16 : 37 (IRVMR)
कोशाच्या तैनातीसाठी लेवी लोकांची नेमणूक मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.
1 इतिहास 16 : 38 (IRVMR)
त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.
1 इतिहास 16 : 39 (IRVMR)
सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले.
1 इतिहास 16 : 40 (IRVMR)
ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.
1 इतिहास 16 : 41 (IRVMR)
आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
1 इतिहास 16 : 42 (IRVMR)
हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.
1 इतिहास 16 : 43 (IRVMR)
नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43