1 इतिहास 25 : 1 (IRVMR)
{गायनवादन करणाऱ्यांचा गट} [PS] दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
1 इतिहास 25 : 2 (IRVMR)
आसाफाच्या वंशातले: [QBR] जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
1 इतिहास 25 : 3 (IRVMR)
यदूथूनाचे वंशज: [QBR] गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. [PE][PS]
1 इतिहास 25 : 4 (IRVMR)
हेमानाचे वंशज: [QBR] बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
1 इतिहास 25 : 5 (IRVMR)
हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले. [PE][PS]
1 इतिहास 25 : 6 (IRVMR)
हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
1 इतिहास 25 : 7 (IRVMR)
ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
1 इतिहास 25 : 8 (IRVMR)
त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. [PE][PS]
1 इतिहास 25 : 9 (IRVMR)
तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: [QBR] पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; [QBR] दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. [QBR]
1 इतिहास 25 : 10 (IRVMR)
तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले. [QBR]
1 इतिहास 25 : 11 (IRVMR)
चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले. [QBR]
1 इतिहास 25 : 12 (IRVMR)
पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 13 (IRVMR)
सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 14 (IRVMR)
सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 15 (IRVMR)
यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 16 (IRVMR)
नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 17 (IRVMR)
दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 18 (IRVMR)
अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 19 (IRVMR)
बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 20 (IRVMR)
तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 21 (IRVMR)
चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 22 (IRVMR)
पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा. [QBR]
1 इतिहास 25 : 23 (IRVMR)
सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 24 (IRVMR)
सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 25 (IRVMR)
अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 26 (IRVMR)
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 27 (IRVMR)
विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 28 (IRVMR)
एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 29 (IRVMR)
बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 30 (IRVMR)
तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण. [QBR]
1 इतिहास 25 : 31 (IRVMR)
चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण. [PE]
❮
❯