1 इतिहास 3 : 1 (IRVMR)
दाविदाचे पुत्र
मत्त. 1:6 आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
1 इतिहास 3 : 2 (IRVMR)
गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
1 इतिहास 3 : 3 (IRVMR)
अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
1 इतिहास 3 : 4 (IRVMR)
4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
1 इतिहास 3 : 5 (IRVMR)
अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
1 इतिहास 3 : 6 (IRVMR)
इतर नऊ पुत्र; इभार, अलीशामा, एलीफलेट,
1 इतिहास 3 : 8 (IRVMR)
अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
1 इतिहास 3 : 9 (IRVMR)
ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
1 इतिहास 3 : 10 (IRVMR)
दाविदाचे पुत्र
मत्त. 1:7-11 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट.
1 इतिहास 3 : 11 (IRVMR)
यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता.
1 इतिहास 3 : 12 (IRVMR)
योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
1 इतिहास 3 : 13 (IRVMR)
योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
1 इतिहास 3 : 14 (IRVMR)
मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.
1 इतिहास 3 : 15 (IRVMR)
योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.
1 इतिहास 3 : 16 (IRVMR)
यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
1 इतिहास 3 : 17 (IRVMR)
यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
1 इतिहास 3 : 18 (IRVMR)
मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
1 इतिहास 3 : 19 (IRVMR)
पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
1 इतिहास 3 : 20 (IRVMR)
जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
1 इतिहास 3 : 21 (IRVMR)
पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
1 इतिहास 3 : 22 (IRVMR)
शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.
1 इतिहास 3 : 23 (IRVMR)
निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
1 इतिहास 3 : 24 (IRVMR)
एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24