1 इतिहास 6 : 1 (IRVMR)
लेवीचे वंशज
उत्प. 46:11
गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
1 इतिहास 6 : 2 (IRVMR)
अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 3 (IRVMR)
अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 4 (IRVMR)
एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
1 इतिहास 6 : 5 (IRVMR)
अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
1 इतिहास 6 : 6 (IRVMR)
उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
1 इतिहास 6 : 7 (IRVMR)
मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
1 इतिहास 6 : 8 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
1 इतिहास 6 : 9 (IRVMR)
अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
1 इतिहास 6 : 10 (IRVMR)
योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
1 इतिहास 6 : 11 (IRVMR)
अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
1 इतिहास 6 : 12 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
1 इतिहास 6 : 13 (IRVMR)
शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
1 इतिहास 6 : 14 (IRVMR)
अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
1 इतिहास 6 : 15 (IRVMR)
परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
1 इतिहास 6 : 16 (IRVMR)
गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
1 इतिहास 6 : 17 (IRVMR)
लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
1 इतिहास 6 : 18 (IRVMR)
अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 19 (IRVMR)
महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
1 इतिहास 6 : 20 (IRVMR)
गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.
1 इतिहास 6 : 21 (IRVMR)
जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय.
1 इतिहास 6 : 22 (IRVMR)
कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.
1 इतिहास 6 : 23 (IRVMR)
अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
1 इतिहास 6 : 24 (IRVMR)
अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
1 इतिहास 6 : 25 (IRVMR)
अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
1 इतिहास 6 : 26 (IRVMR)
एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ.
1 इतिहास 6 : 27 (IRVMR)
नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल.
1 इतिहास 6 : 28 (IRVMR)
1 इतिहास 6 : 29 (IRVMR)
थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र. मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा.
1 इतिहास 6 : 30 (IRVMR)
उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
1 इतिहास 6 : 31 (IRVMR)
दावीद मंदिरासाठी गायकराण नेमतो कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
1 इतिहास 6 : 32 (IRVMR)
यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
1 इतिहास 6 : 33 (IRVMR)
गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र.
1 इतिहास 6 : 34 (IRVMR)
शमुवेल एलकानाचा पुत्र. एलकाना यरोहामाचा पुत्र. यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
1 इतिहास 6 : 35 (IRVMR)
तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र.
1 इतिहास 6 : 36 (IRVMR)
अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र.
1 इतिहास 6 : 37 (IRVMR)
सफन्या तहथचा पुत्र. तहथ अस्सीरचा पुत्र. अस्सीर एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र.
1 इतिहास 6 : 38 (IRVMR)
कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र.
1 इतिहास 6 : 39 (IRVMR)
आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र.
1 इतिहास 6 : 40 (IRVMR)
शिमा मीखाएलचा पुत्र. मिखाएल बासेया याचा पुत्र. बासेया मल्कीया याचा पुत्र.
1 इतिहास 6 : 41 (IRVMR)
मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहचा पुत्र जेरह हा अदाया याचा पुत्र.
1 इतिहास 6 : 42 (IRVMR)
अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र.
1 इतिहास 6 : 43 (IRVMR)
शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र.
1 इतिहास 6 : 44 (IRVMR)
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.
1 इतिहास 6 : 45 (IRVMR)
मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
1 इतिहास 6 : 46 (IRVMR)
हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र.
1 इतिहास 6 : 47 (IRVMR)
शेमेर महलीचा पुत्र. महली मूशीचा पुत्र, मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
1 इतिहास 6 : 48 (IRVMR)
आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
1 इतिहास 6 : 49 (IRVMR)
अहरोनाचे वंशज
1 इतिहास 6 : 50 (IRVMR)
अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत. अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.
1 इतिहास 6 : 51 (IRVMR)
अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
1 इतिहास 6 : 52 (IRVMR)
जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
1 इतिहास 6 : 53 (IRVMR)
अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
1 इतिहास 6 : 54 (IRVMR)
लेवी लोकांची नगरे
यहो. 21:1-42
अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
1 इतिहास 6 : 55 (IRVMR)
यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.
1 इतिहास 6 : 56 (IRVMR)
त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
1 इतिहास 6 : 57 (IRVMR)
अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
1 इतिहास 6 : 58 (IRVMR)
हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह.
1 इतिहास 6 : 59 (IRVMR)
आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
1 इतिहास 6 : 60 (IRVMR)
बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
1 इतिहास 6 : 61 (IRVMR)
कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
1 इतिहास 6 : 62 (IRVMR)
गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
1 इतिहास 6 : 63 (IRVMR)
मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
1 इतिहास 6 : 64 (IRVMR)
ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
1 इतिहास 6 : 65 (IRVMR)
यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
1 इतिहास 6 : 66 (IRVMR)
एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
1 इतिहास 6 : 67 (IRVMR)
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
1 इतिहास 6 : 68 (IRVMR)
यकमाम, बेथ-होरोन,
1 इतिहास 6 : 69 (IRVMR)
अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
1 इतिहास 6 : 70 (IRVMR)
1 इतिहास 6 : 71 (IRVMR)
मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली. गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
1 इतिहास 6 : 72 (IRVMR)
त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
1 इतिहास 6 : 73 (IRVMR)
रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह.
1 इतिहास 6 : 74 (IRVMR)
माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
1 इतिहास 6 : 75 (IRVMR)
हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
1 इतिहास 6 : 76 (IRVMR)
गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
1 इतिहास 6 : 77 (IRVMR)
आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
1 इतिहास 6 : 78 (IRVMR)
यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
1 इतिहास 6 : 79 (IRVMR)
कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
1 इतिहास 6 : 80 (IRVMR)
मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
1 इतिहास 6 : 81 (IRVMR)
हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81