1 इतिहास 7 : 1 (IRVMR)
{#1इस्साखाराचे वंशज [BR]उत्प. 46:13 } [PS]इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
1 इतिहास 7 : 2 (IRVMR)
उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
1 इतिहास 7 : 3 (IRVMR)
इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. [PE]
1 इतिहास 7 : 4 (IRVMR)
[PS]त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
1 इतिहास 7 : 5 (IRVMR)
इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. [PE]
1 इतिहास 7 : 6 (IRVMR)
{#1बन्यामिनाचे वंशज [BR]उत्प. 46:21 } [PS]बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
1 इतिहास 7 : 7 (IRVMR)
बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते. [PE]
1 इतिहास 7 : 8 (IRVMR)
[PS]जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
1 इतिहास 7 : 9 (IRVMR)
आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
1 इतिहास 7 : 10 (IRVMR)
यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. [PE]
1 इतिहास 7 : 11 (IRVMR)
[PS]यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
1 इतिहास 7 : 12 (IRVMR)
शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम. [PE]
1 इतिहास 7 : 13 (IRVMR)
{#1नफतालीचे वंशज [BR]उत्प. 46:24 }
1 इतिहास 7 : 14 (IRVMR)
[PS]यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज. [PE][PS]मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
1 इतिहास 7 : 15 (IRVMR)
हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
1 इतिहास 7 : 16 (IRVMR)
माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम. [PE]
1 इतिहास 7 : 17 (IRVMR)
[PS]ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
1 इतिहास 7 : 18 (IRVMR)
माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
1 इतिहास 7 : 19 (IRVMR)
अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र. [PE]
1 इतिहास 7 : 20 (IRVMR)
{#1एफ्राइमाचे वंशज } [PS]एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः [PE][QS]एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. [QE][QS]शुथेलहचा पुत्र बेरेद. [QE][QS]बेरेदाचा पुत्र तहथ. [QE][QS]तहथाचा पुत्र एलादा. [QE][QS]एलादाचा पुत्र तहथ. [QE]
1 इतिहास 7 : 21 (IRVMR)
[QS]तहथचा पुत्र जाबाद. [QE][QS]जाबादचा पुत्र शुथेलह. [QE][MS]गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
1 इतिहास 7 : 22 (IRVMR)
एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. [ME]
1 इतिहास 7 : 23 (IRVMR)
[PS]मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
1 इतिहास 7 : 24 (IRVMR)
त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली. [PE]
1 इतिहास 7 : 25 (IRVMR)
[QS]रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. [QE][QS]रेफहचा पुत्र रेशेफ. [QE][QS]रेशेफचा पुत्र तेलह. [QE][QS]तेलहचा पुत्र तहन. [QE]
1 इतिहास 7 : 26 (IRVMR)
[QS]तहनचा पुत्र लादान. [QE][QS]लादानचा पुत्र अम्मीहूद. [QE][QS]आम्मीहूदचा अलीशामा.
1 इतिहास 7 : 27 (IRVMR)
त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा. [QE]
1 इतिहास 7 : 28 (IRVMR)
[PS]एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
1 इतिहास 7 : 29 (IRVMR)
मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते. [PE]
1 इतिहास 7 : 30 (IRVMR)
{#1आशेराचे वंशज [BR]उत्प. 46:17 } [PS]इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
1 इतिहास 7 : 31 (IRVMR)
हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
1 इतिहास 7 : 32 (IRVMR)
यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता. [PE]
1 इतिहास 7 : 33 (IRVMR)
[PS]पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
1 इतिहास 7 : 34 (IRVMR)
अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
1 इतिहास 7 : 35 (IRVMR)
शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल. [PE]
1 इतिहास 7 : 36 (IRVMR)
[PS]सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
1 इतिहास 7 : 37 (IRVMR)
बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
1 इतिहास 7 : 38 (IRVMR)
यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र. [PE]
1 इतिहास 7 : 39 (IRVMR)
[PS]आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
1 इतिहास 7 : 40 (IRVMR)
हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते. [PE]
❮
❯