1 करिंथकरांस 12 : 1 (IRVMR)
{आध्यात्मिक दानांची विविधता व एकता} [PS] बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
1 करिंथकरांस 12 : 2 (IRVMR)
जेव्हा तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे चालवले जात होता तसे तुम्ही या मुक्या मूर्तींकडे नेले जात होता. हे तुम्हास ठाऊक आहे.
1 करिंथकरांस 12 : 3 (IRVMR)
म्हणून मी तुम्हास सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे,” असे म्हणू शकत नाही.
1 करिंथकरांस 12 : 4 (IRVMR)
आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
1 करिंथकरांस 12 : 5 (IRVMR)
तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.
1 करिंथकरांस 12 : 6 (IRVMR)
आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे.
1 करिंथकरांस 12 : 7 (IRVMR)
पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.
1 करिंथकरांस 12 : 8 (IRVMR)
कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
1 करिंथकरांस 12 : 9 (IRVMR)
दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,
1 करिंथकरांस 12 : 10 (IRVMR)
आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे.
1 करिंथकरांस 12 : 11 (IRVMR)
पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो. [PS]
1 करिंथकरांस 12 : 12 (IRVMR)
{शरीरावरून घेतलेले उदाहरण} [PS] कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
1 करिंथकरांस 12 : 13 (IRVMR)
कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले.
1 करिंथकरांस 12 : 14 (IRVMR)
कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.
1 करिंथकरांस 12 : 15 (IRVMR)
जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
1 करिंथकरांस 12 : 16 (IRVMR)
आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
1 करिंथकरांस 12 : 17 (IRVMR)
सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?
1 करिंथकरांस 12 : 18 (IRVMR)
पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे.
1 करिंथकरांस 12 : 19 (IRVMR)
ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?
1 करिंथकरांस 12 : 20 (IRVMR)
पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत,
1 करिंथकरांस 12 : 21 (IRVMR)
आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’
1 करिंथकरांस 12 : 22 (IRVMR)
तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत.
1 करिंथकरांस 12 : 23 (IRVMR)
आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते.
1 करिंथकरांस 12 : 24 (IRVMR)
कारण आपल्या शोभून दिसणार्‍या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे.
1 करिंथकरांस 12 : 25 (IRVMR)
म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
1 करिंथकरांस 12 : 26 (IRVMR)
आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
1 करिंथकरांस 12 : 27 (IRVMR)
आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात.
1 करिंथकरांस 12 : 28 (IRVMR)
आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
1 करिंथकरांस 12 : 29 (IRVMR)
सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय?
1 करिंथकरांस 12 : 30 (IRVMR)
सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?
1 करिंथकरांस 12 : 31 (IRVMR)
पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: