1 करिंथकरांस 2 : 1 (IRVMR)
{तत्त्वज्ञान व प्रकटीकरण} [PS] बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही.
1 करिंथकरांस 2 : 2 (IRVMR)
कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे.
1 करिंथकरांस 2 : 3 (IRVMR)
आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो.
1 करिंथकरांस 2 : 4 (IRVMR)
माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते.
1 करिंथकरांस 2 : 5 (IRVMR)
जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. [PE][PS]
1 करिंथकरांस 2 : 6 (IRVMR)
तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
1 करिंथकरांस 2 : 7 (IRVMR)
तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
1 करिंथकरांस 2 : 8 (IRVMR)
हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते.
1 करिंथकरांस 2 : 9 (IRVMR)
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, [QBR] “डोळ्यांनी पाहिले नाही, [QBR] कानांनी ऐकले नाही आणि [QBR] मनुष्याच्या मनात जे आले नाही, [QBR] ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” [PE][PS]
1 करिंथकरांस 2 : 10 (IRVMR)
ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.
1 करिंथकरांस 2 : 11 (IRVMR)
कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही.
1 करिंथकरांस 2 : 12 (IRVMR)
परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.
1 करिंथकरांस 2 : 13 (IRVMR)
मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
1 करिंथकरांस 2 : 14 (IRVMR)
स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.
1 करिंथकरांस 2 : 15 (IRVMR)
जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.
1 करिंथकरांस 2 : 16 (IRVMR)
कारण पवित्र शास्त्र म्हणते, [QBR] “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: