1 करिंथकरांस 5 : 1 (IRVMR)
{भयंकर स्वरूपाच्या अनीतीचे एक उदाहरण} [PS] मी अशी बातमी ऐकली आहे की, तुमच्यामध्ये व्यभिचार चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.
1 करिंथकरांस 5 : 2 (IRVMR)
आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हास त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.
1 करिंथकरांस 5 : 3 (IRVMR)
कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्याप्रमाणे त्याचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे,
1 करिंथकरांस 5 : 4 (IRVMR)
जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने एकत्र जमाल आणि तेव्हा आपला प्रभू येशू ह्याच्या सामर्थ्याने, माझा आत्मा तुमच्याबरोबर असेल,
1 करिंथकरांस 5 : 5 (IRVMR)
तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे.
1 करिंथकरांस 5 : 6 (IRVMR)
तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना?
1 करिंथकरांस 5 : 7 (IRVMR)
म्हणून तुम्ही जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर झाला आहात तसे तुम्ही एक नवीन गोळा व्हावे कारण आपला वल्हांडणाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे.
1 करिंथकरांस 5 : 8 (IRVMR)
तर आपण जुन्या खमिराने किंवा वाईटपणा व कुकर्माच्या खमिराने नाही, पण सरळपणा व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू या. [PE][PS]
1 करिंथकरांस 5 : 9 (IRVMR)
मी तुम्हास माझ्या पत्रात लिहिले होते की व्यभिचाऱ्याशी संबंध ठेवू नका.
1 करिंथकरांस 5 : 10 (IRVMR)
तथापि जगातले व्यभिचारी, लोभी, लुबाडणारे किंवा मूर्तीपुजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण मग तुम्हास जगातून बाहेर जावे लागेल.
1 करिंथकरांस 5 : 11 (IRVMR)
पण आता, मी तुम्हास लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हणलेला असा कोणी जर व्यभिचारी, लोभी किंवा मूर्तीपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा मनुष्यांबरोबर जेवूही नका.
1 करिंथकरांस 5 : 12 (IRVMR)
कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध? त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?
1 करिंथकरांस 5 : 13 (IRVMR)
पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून [QBR] ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’ [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: