1 करिंथकरांस 8 : 1 (IRVMR)
{मूर्तीला दाखविलेले नैवेद्य} [PS] आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
1 करिंथकरांस 8 : 2 (IRVMR)
आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.
1 करिंथकरांस 8 : 3 (IRVMR)
पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो.
1 करिंथकरांस 8 : 4 (IRVMR)
म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
1 करिंथकरांस 8 : 5 (IRVMR)
कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील, [QBR]
1 करिंथकरांस 8 : 6 (IRVMR)
परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. [QBR] ज्याच्यासाठी आपण जगतो आणि [QBR] ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले [QBR] आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. [QBR] ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो. [PS]
1 करिंथकरांस 8 : 7 (IRVMR)
{दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी} [PS] पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो.
1 करिंथकरांस 8 : 8 (IRVMR)
पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
1 करिंथकरांस 8 : 9 (IRVMR)
पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या.
1 करिंथकरांस 8 : 10 (IRVMR)
कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या असलेल्या ठिकाणी भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना?
1 करिंथकरांस 8 : 11 (IRVMR)
आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो.
1 करिंथकरांस 8 : 12 (IRVMR)
पण तुम्ही जेव्हा अशाप्रकारे बंधूच्या विरूद्ध पाप करून त्यांचा दुर्बळ असलेला विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
1 करिंथकरांस 8 : 13 (IRVMR)
म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: