1 शमुवेल 15 : 1 (IRVMR)
शौलाने आज्ञाभंग शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपले लोक इस्राएल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले तर आता तू परमेश्वराची वचने ऐक.
1 शमुवेल 15 : 2 (IRVMR)
सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल मिसरातून वर येत असता अमालेकाने त्यास काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे.
1 शमुवेल 15 : 3 (IRVMR)
आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”
1 शमुवेल 15 : 4 (IRVMR)
मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती.
1 शमुवेल 15 : 5 (IRVMR)
मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.
1 शमुवेल 15 : 6 (IRVMR)
तेव्हा शौलाने केनी लोकांस म्हटले, “अमालेक्याबरोबर तुम्हास मारू नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा; कारण इस्राएल लोक मिसरांतून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहाने वर्तला.” तेव्हा केनी अमालेक्यामधून निघून गेले.
1 शमुवेल 15 : 7 (IRVMR)
मग शौलाने हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यंत अमालेक्यांना मार दिला.
1 शमुवेल 15 : 8 (IRVMR)
त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.
1 शमुवेल 15 : 9 (IRVMR)
तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला.
1 शमुवेल 15 : 10 (IRVMR)
तेव्हा परमेश्वराचे वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणाले,
1 शमुवेल 15 : 11 (IRVMR)
“मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.
1 शमुवेल 15 : 12 (IRVMR)
शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.
1 शमुवेल 15 : 13 (IRVMR)
मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”
1 शमुवेल 15 : 14 (IRVMR)
तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
1 शमुवेल 15 : 15 (IRVMR)
मग शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली. कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातील उत्तम ती परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पण आम्ही बाकीचा पूर्णपणे नाश केला.”
1 शमुवेल 15 : 16 (IRVMR)
तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!”
1 शमुवेल 15 : 17 (IRVMR)
मग शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने लहान होतास तेव्हा तुला इस्राएलाच्या वंशांचा मुख्य करण्यात आले नाही काय? आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राजा केले”
1 शमुवेल 15 : 18 (IRVMR)
परमेश्वराने तुला तुझ्या मार्गावर पाठवून सांगितले की, जा त्या पापी अमालेक्यांचा नाश कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याशी लढाई कर.
1 शमुवेल 15 : 19 (IRVMR)
तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
1 शमुवेल 15 : 20 (IRVMR)
तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी परमेश्वराचे वचन खरोखरच पाळले व ज्या मार्गावर परमेश्वराने मला पाठवले त्यामध्ये मी चाललो आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहे.
1 शमुवेल 15 : 21 (IRVMR)
परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरे व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी परमेश्वर तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी ठेवून घेतली.”
1 शमुवेल 15 : 22 (IRVMR)
शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.
1 शमुवेल 15 : 23 (IRVMR)
कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”
1 शमुवेल 15 : 24 (IRVMR)
मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.
1 शमुवेल 15 : 25 (IRVMR)
तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
1 शमुवेल 15 : 26 (IRVMR)
शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही; कारण तू देवाचे वचन धिक्कारले, आणि परमेश्वराने तुला इस्राएलावर राज्य करण्यापासून धिक्कारले आहे.”
1 शमुवेल 15 : 27 (IRVMR)
शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
1 शमुवेल 15 : 28 (IRVMR)
तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले, “परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्यास दिले आहे.
1 शमुवेल 15 : 29 (IRVMR)
तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
1 शमुवेल 15 : 30 (IRVMR)
तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. तरी आता मी तुला विनंती करतो माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्राएलासमोर तू माझा सन्मान कर आणि परमेश्वर तुझा देव याचे भजन पूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये.”
1 शमुवेल 15 : 31 (IRVMR)
मग शमुवेल वळून शौलाच्या मागे आला आणि शौलाने परमेश्वराचे भजन पूजन केले.
1 शमुवेल 15 : 32 (IRVMR)
मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.
1 शमुवेल 15 : 33 (IRVMR)
तेव्हा शमुवेल म्हणाला, “जसे तुझ्या तलवारीने स्त्रियांना बालकांविरहित केले आहे, तशी बायकांमध्ये तुझी आई बालकाविरहित होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वराच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
1 शमुवेल 15 : 34 (IRVMR)
त्यानंतर शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला.
1 शमुवेल 15 : 35 (IRVMR)
शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलाने शौलासाठी शोक केला; आपण शौलाला इस्राएलांवर राजा केले म्हणून परमेश्वर अनुतापला.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35