1 शमुवेल 18 : 1 (IRVMR)
योनाथान आणि दावीद ह्यांच्यामधील करार तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.
1 शमुवेल 18 : 2 (IRVMR)
त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.
1 शमुवेल 18 : 3 (IRVMR)
मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
1 शमुवेल 18 : 4 (IRVMR)
योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला.
1 शमुवेल 18 : 5 (IRVMR)
तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.
1 शमुवेल 18 : 6 (IRVMR)
शौलाच्या अंतःकरणात दाविदाविषयी मत्सर मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.
1 शमुवेल 18 : 7 (IRVMR)
त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”
1 शमुवेल 18 : 8 (IRVMR)
तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?”
1 शमुवेल 18 : 9 (IRVMR)
त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला.
1 शमुवेल 18 : 10 (IRVMR)
मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता.
1 शमुवेल 18 : 11 (IRVMR)
तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
1 शमुवेल 18 : 12 (IRVMR)
मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
1 शमुवेल 18 : 13 (IRVMR)
शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
1 शमुवेल 18 : 14 (IRVMR)
दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
1 शमुवेल 18 : 15 (IRVMR)
जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला.
1 शमुवेल 18 : 16 (IRVMR)
परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
1 शमुवेल 18 : 17 (IRVMR)
मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.
1 शमुवेल 18 : 18 (IRVMR)
तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?”
1 शमुवेल 18 : 19 (IRVMR)
परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.
1 शमुवेल 18 : 20 (IRVMR)
तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करीत असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले.
1 शमुवेल 18 : 21 (IRVMR)
तेव्हा शौलाने म्हटले, “मी ती त्यास देईन आणि ती त्यास पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला दुसऱ्यांदा म्हटले की, तू माझा जावई होशील.”
1 शमुवेल 18 : 22 (IRVMR)
शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”
1 शमुवेल 18 : 23 (IRVMR)
शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.
1 शमुवेल 18 : 24 (IRVMR)
मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्यास सांगितले.
1 शमुवेल 18 : 25 (IRVMR)
तेव्हा शौलाने म्हटले, “तुम्ही दावीदास असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही.” परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते.
1 शमुवेल 18 : 26 (IRVMR)
मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.
1 शमुवेल 18 : 27 (IRVMR)
नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्यास पत्नी करून दिली.
1 शमुवेल 18 : 28 (IRVMR)
मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.
1 शमुवेल 18 : 29 (IRVMR)
तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.
1 शमुवेल 18 : 30 (IRVMR)
नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30